'या' राज्यांमध्येही होणार 'मविआ' सारखा प्रयोग?; संजय राऊतांनी दिले संकेत

'या' राज्यांमध्येही होणार 'मविआ' सारखा प्रयोग?; संजय राऊतांनी दिले संकेत
संजय राऊत

मुंबई | Mumbai

सध्या देशभरातून निवडणूकांचे (Election) वारे वाहू लागलेले आहे, देशभरात येणाऱ्या आगामी निवडणूकांसाठी सगळ्याच राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दरम्यान आगामी गोवा (Goa Assembly election) आणि उत्तर प्रदेश निवडणूकांमध्ये (Uttar Pradesh Assembly election) शिवसेना (Shivsena) ताकदीने लढणार असल्याचे संकेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे, माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही मविआचा प्रयोग करणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी दिले आहे.

'गोव्यात शिवसेनेच्या (Goa Shivsena) स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) आम्ही ८० ते १०० जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो,' तसेच उत्तर प्रदेश निवडणुकांबाबतही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 'उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू,' असंही राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपने गुजरातचा (BJP Gujrat) मुख्यमंत्री बदलला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचा मुख्यमंत्री बदलणं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले. यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा त्या पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. त्यावर इतरांनी बोलू नये. पण एक सांगतो गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही. पाच वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं. ते बहुमत आणण्यात आलं. बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा जशा खेचून आणल्या तेच गुजरातमध्ये झालं, असा चिमटा काढतानाच पक्ष मजबूत करणं हा त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित होणार नाही, असंही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com