Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानॉट रिचेबल धनंजय मुंडे थेट विधान भवनात; राजकीय चर्चांना उधाण

नॉट रिचेबल धनंजय मुंडे थेट विधान भवनात; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील ५३ आमदारांपैकी ४० आमदार भाजपासोबत आपलं सरकार स्थापन करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत…

- Advertisement -

त्यातच राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Not Reachable) काल पासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांचे दोन्ही नंबर बंद असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मुंडे हे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. मंत्रालयातील लोढा यांच्या कार्यालयातील धनंजय मुंडे यांचे फोटो समोर आले असून लोढा यांच्या भेटीनंतर ते आता अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दाखल झाले आहेत.

अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांचे पत्र सह्यानिशी तयार? ‘त्या’ बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मात्र आता धनंजय मुंडे यांनी या भेटी मागचे कारण सांगितलं असून ते त्यांच्या कामानिमित्त आले असल्याची त्यांनी सांगितले. त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत त्यांनी मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतल्याचे यावेळी म्हणाले.

अजित पवारांशी चर्चा केली असल्याचे धनंजय मुंडे यांनीही सांगितले आहे. दरम्यान, आज सकाळी धनंजय मुंडे हे विधान भवनात अचानक दिसून आले आहे. कालपासून ते नॉट रिचेबल होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे हे पहाटेच्या शपथविधीवेळीही अजित पवारांसोबत होते, असं सांगण्यात येतंय. आज पुन्हा एकदा भाजपसोबत मोटबांधीच्या चर्चा सुरु असताना धनंजय मुंडे विधानभवनात (Dhananjay Munde In Vidhan Bhavan) दाखल झाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले, म्हणाले….

यावेळी विशेष म्हणजे आमदारांना फोन करून सदर राजकीय घडामोडींसाठी तयार करण्याची मोठी जबाबदारी धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपात शामिल होतील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं आतापर्यंतच्या घडामोडींतून समोर आलंय. आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्रही तयार करण्यात आलंय, फक्त आता योग्य वेळ आली की हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार, असं म्हटलं जातंय.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या