“ना काँग्रेस-ना भाजप”; अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा

“ना काँग्रेस-ना भाजप”; अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा

दिल्ली | Delhi

काँग्रेस (Congress) नेते कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) हे पंजाब (Punjab) च्या मुख्यमंत्री पदावरुन बाजूला झाल्यानंतर पुढे काय करणार याबाबत उत्सुकता होती.

दरम्यान, त्यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्याशी झाली. ते पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (National Security Advisor Ajit Doval) यांनाही भेटले. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) हे भाजप (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या होत्या.

मात्र स्वत: अमरिंदर सिंह (Amrinder Singh) यांनी आपण भाजपमध्ये (BJP) जाणार नाही. मात्र काँग्रेसपासून (Congress) वेगळे होणार असल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील नव्या राजकीय संकटाच्या (Panjab Political Crisis) पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा झटका (Big jolt to Congress) मानला जात आहे. एका मुलाखतीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुलाखतीत बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, 'अनेक वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये आहे, मात्र आता मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. काँग्रेस आमदारांची बैठक बोलावल्याचे मला ऐनवेळी सांगण्यात आले. त्याचवेळी मी मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. माझ्यावर कोणाचा विश्वासच नसेल तर माझा पक्षात राहून फायदा काय. तसेच आता मी माझा अपमान सहन करणार नाही. माझ्यासोबतचे त्यांचे (काँग्रेस पक्षाचे) वर्तन योग्य नव्हते, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी आपण काँग्रेसला रामराम करणार असलो तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही स्पष्ट केले.

तसेच, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाची लोकप्रियता घटत असल्याचेही अमरिंदर सिंग म्हणाले. काँग्रेसची लोकप्रियता घटत आहे, तर आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत आहे, असे ते म्हणाले. तसेच पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असणार आहे. काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्षामुळे चूरस निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आज अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. डोवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अमरिंदर सिंग यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही कागदपत्रं नक्की कशासंदर्भात आहेत याबद्दल खुलासा होऊ शकतेलेला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com