संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?
...तर ५० वर्षे तुरुंगात खितपत पडाल; राऊतांचा राणेंना थेट इशारा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली आणि हे वॉरंट जारी केलं. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?
महापालिकेत जोरदार राडा; आप आणि भाजपचे नगरसेवक भिडले, पाहा VIDEO

काय आहे नेमकं प्रकरण?

संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे.

राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?
Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन

दरम्यान याप्रकरणावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. काही जणांना अजामीनपात्र वॉरंट काढलं यामध्ये फार मोठी गोष्ट वाटते. आम्ही न्यायालयासमोर हजर राहू शकलो नाही, याचा मलाही खेद आहे. मी आमच्या वकीलाला सांगितलं आहे, की ताबडतोब न्यायालयात जाऊन विनंती करा की उच्च न्यायालयात एक विषय होता. तिथून मला इथे येण्यास खूप वाहतूक कोंडी असल्याने मी पोहचू शकलो नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com