Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांना कर्जासाठी सिबीलची अट नको!; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबीलची अट नको!; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी त्यांना सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सोमवारी बँकांना केली.

- Advertisement -

नाबार्डच्या ( NABARD) वतीने आज येथील सह्याद्री अतिथीगृहात स्टेट क्रेडिट सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाबार्डच्या २०२३-२४ च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

बनावट अनुभवपत्र सादर करत शासनाची कोटी रुपयांची फसवणूक

या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी ६ लाख ३४ हजार ५८ कोटी रुपयांच्या क्रेडीट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. २०२१-२२ या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात ४७ टक्के वाढ झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे पुढे नेत आहोत. त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर (State Focus Paper) उपयुक्त ठरेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

साहित्यिक व कलावंतांना मिळणार मानधन

आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज गरजा बँकिंग (banking) प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील आणि आत्महत्यांचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

राज्य आर्थिक परिषदेत नाबार्डचा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग तसेच बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही शिंदे म्हणाले.

नायब तहसीलदार बेमुदत संपावर; महसूलमंत्र्यांनी बोलावली बैठक

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उल्लेख करत अडीच वर्ष बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले. गेल्या नऊ महिन्यात २७ सिंचन प्रकल्पांना गती दिल्याचे सांगत हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानाशी जुळवून घेण्यासाठी आणि प्रतिकूलता कमी करण्यासाठी नाबार्ड राबवीत असलेल्या उपक्रमांसाठी एकनाथ शिंदे यांनी नाबार्डचे कौतुक केले.

आजच्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अतुल सावे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

स्टेट फोकस पेपर
नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांनी स्टेट फोकस पेपरची माहिती दिली. यात २०२३-२४ साठी कृषी क्षेत्राकरिता १ लाख ५६ हजार ८७३ कोटी (२४.७%), एसएमईसाठी ३ लाख ५४ हजार ८५४ कोटी ( ५६%), अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी १ लाख २२ हजार ३३१ कोटी ( १९.३%) क्रेडीट क्षमता असल्याचे नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या