Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये महागठबंधन!

बिहारमध्ये महागठबंधन!

दिल्ली | Delhi

बिहारच्या राजकारणात गेल्या दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या. नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत मंगळवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी महाआघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा केला होता.

- Advertisement -

आज दुपारी दोन वाजता नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. बिहारच्या राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

तर राजदचे नेते तेजस्वी यादव (RJD leader Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नितीश कुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. जदयु, राजद, काँग्रेस अशा नऊ पक्षांची महाआघाडी करून त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या