Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?; आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?; आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

नवी दिल्ली । New Delhi

देशाच्या राजकारणात अग्रस्थानी असलेल्या बिहारमध्ये (Bihar) मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे…

- Advertisement -

एका बाजूला लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (Rashtriya Janata Dal) भाजपा (BJP) आणि केंद्र सरकारच्या विरोधात (Central Government) युद्धच छेडले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार (CM Nitish Kumar) यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे आपल्या आमदारांशी (mla) सातत्याने चर्चा करत आहेत. भाजपासोबत युती करून सत्तेवर असतानाही त्यांनी पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते, आमदारांना (mla) पटणामधून (Patna) बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

तर नितीश कुमार (Tejaswi Yadav) भाजपाची साथ सोडून राजदसोबत (RJD) पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी नितीश कुमार यांनी मंत्री, आमदार, माजी आमदार, खासदार आदींशी बैठका केल्या आहेत.

महत्वाची बाब म्हणजे नितीशकुमार राजदच्या इफ्तार पार्टीला गेले होते. तर तेजस्वी यादव हे नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला आले होते. यामुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

तसेच गेल्यावेळी नितीशकुमार यांनी राजदसोबत हातमिळवणी करत सत्ता राखली होती. परंतू काही महिन्यांतच लालू यांचे दोन्ही सुपूत्र डोईजड ठरू लागल्याने नितीश कुमार यांनी भाजपासोबत (BJP) हातमिळवणी करत सत्ता राखली होती.

तर पुढची विधानसभा निवडणूक (Election) त्यांनी भाजपासोबतच लढविली. परंतू नितीशकुमार यांना त्याचा मोठा फटका बसला आणि जागा कमी झाल्या. तरीदेखील भाजपाने (BJP) त्यांना शब्द दिलेला असे सांगत नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद सोडत आपल्य़ा पदरात महत्वाची खाती पाडून घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या