‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊतांना धक्काबुक्की

‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊतांना धक्काबुक्की

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ सुरु आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून ही यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे...

काल (१ नोव्हेंबर) ही यात्रा हैदराबाद शहरात होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत. त्यातच राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) सुद्धा तेलंगणातील यात्रेत सामील झाले होते. मात्र, यात्रेदरम्यान राऊत यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊतांना धक्काबुक्की
Video : नाशिक-पुणे महामार्गावर 'द बर्निंग शिवशाही'चा थरार

भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर नितीन राऊत यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे ते खाली पडले आणि उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, हात आणि पायालाही दुखापत झाल्याचे समजते. नितीन राऊत यांना तत्काळ उपचारासाठी हैदराबादमधील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘भारत जोडो यात्रे’त नितीन राऊतांना धक्काबुक्की
'पुण्याहून पुणतांबा'! स्पाईस जेट विमानसेवेचा अजब कारभार; वाचा सविस्तर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com