रावेर, यावल, सावदा भागासाठी कृषी आकस्मिक निधी वापरा

रावेर, यावल, सावदा भागासाठी कृषी आकस्मिक निधी वापरा

मुंबई / प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा आणि यावल भागात कृषी आकस्मिक निधीचा वापर करून देखभाल, दुरुस्तीची कामे वेगाने करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.

रावेर, यावल, सावदा भागासाठी कृषी आकस्मिक निधी वापरा
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन


रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या पुढाकाराने वीज समस्यावर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत डॉ. राऊत यांनी हे आदेश दिले. नादुरुस्त रोहित्रे वेळेत दुरुस्त करून देण्याबाबत, फिडरची लांबी कमी करणे, रोहित्रांना ऑईल पुरवठा करणे, सातपुड्याच्या पर्वतीय भागात वसलेल्या आदिवासी गावांना योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी 33/11 केव्ही उपकेंद्राची उभारणी, धरणा जवळील भागात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी व इतर विषयावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी यावेळी महावितरणला दिलेत.

जळगाव जिल्ह्यात नवीन कृषिपंप धोरणांतर्गत शेतकऱ्यांनी 73.42 कोटी रुपयांचा भरणा केला असून यातील 24.23 कोटी रुपयांचा उपयोग ग्रामपंचायत स्तरावर व 24.23 कोटी रुपये इतकी रक्कम कृषिपंप वीज जोडणीसाठी वापर करण्यात येणार आहे.

रावेर, सावदा व यावल या भागातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करून रोहित्र तेलाचा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ राऊत यांनी यावेळी दिल्यात.

महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतिष चव्हाण, मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झालटे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com