नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!

नागपूर | Nagpur

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आरोपीनं दोनदा फोन करून गडकरींना ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले.

यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com