“छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे…”; कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींनी सोडलं मौन, ट्विट केला Video

“छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे…”; कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींनी सोडलं मौन, ट्विट केला Video

मुंबई | Mumbai

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी राज्यपालांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान, या साऱ्या गदारोळात गडकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा.. निश्चयाचा महामेरु.. बहुत जणांसी आधारु... अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी... वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता..., असे म्हणतानाचा व्हिडीओ गडकरी यांनी पोस्ट केला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शिवरायांचं त्यांच्या आयुष्यातील स्थान, शिवरायांचं मोठेपण आणि त्यांच्या जीवनावर असलेला शिवरायांचा प्रभाव अधोरेखित करताना महामहिम राज्यपालांना एकप्रकारे 'तुम्ही चुकलात' हेच सांगण्याचा गडकरींनी प्रयत्न केला.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

"आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्याना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्याना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींच नाव घ्यायचे मला अस वाटत की जर कुणी तुम्हाला विचारल की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरापासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील अस भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com