राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत नितेश राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पैसे देऊन...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत नितेश राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पैसे देऊन...

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) घेऊन महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाले. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप जळगाव जामोदमध्ये होणार होता, आता भारत जोडो यात्रेचा मुक्काम दोन दिवस वाढला आहे...

भारत जोडो यात्रेबाबत भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारत जोडो यात्रेतील कलाकार पैसे देऊन आणले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेत जे कलाकार दिसतात त्यांना पैसे देऊन आणले आहे, असे एका एजन्सीला पाठवलेल्या मेसेजवरून स्पष्ट होत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत नितेश राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पैसे देऊन...
धोडप किल्ल्यावर जाताय? आधी 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच...

मध्य प्रदेशमध्ये कुठला कलाकार चालू शकतो, यासाठी पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, असा संदेश भारत जोडो यात्रेच्या टीमकडून काही एजन्सीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही जी नौटंकी आणि जे कलाकार राहुल गांधीसोबत 15-15 मिनिटे चालत आहेत ते पैसे देऊन आणलेत का? असा प्रश्न विचारला जात आहे, असे राणे म्हणाले.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत नितेश राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पैसे देऊन...
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

दरम्यान, आता राणेंच्या आरोपानंतर काँग्रेस यावर काय उत्तर देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com