Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंना जोर का झटका; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

नितेश राणेंना जोर का झटका; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

सिंधूदुर्ग | Sindhudurg

शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणात संशयित आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना जोर का झटका मिळाला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. आज कोर्टाने जामीन नाकारल्याचा निर्णय दिला आहे…

- Advertisement -

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड. प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. कोर्टाने जामीन नाकारला असून यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.

भाजप आमदार नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आहे. गाडी अडवल्याचे नेमकं कारण समजू शकलेले नाही. दरम्यान यावेळी पोलीस आणि निलेश राणे यांच्याच वाद झाला. कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या