Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस चौकशीपूर्वी नितेश राणेंचं सूचक ट्विट; म्हणाले, 'खेल आपने शुरू किया, लेकिन...'

पोलीस चौकशीपूर्वी नितेश राणेंचं सूचक ट्विट; म्हणाले, ‘खेल आपने शुरू किया, लेकिन…’

मुंबई | Mumbai

दिशा सालियन प्रकरणी (Disha Salian case) केंद्रीय मंत्री नारायण राणे (UNION MINISTER Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना आज चौकशीसाठी दुपारी एक वाजता मुंबईतील (Mumbai) मालवणी पोलीस स्टेशनमध्ये (Malvani Police Station) हजर राहावं लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

- Advertisement -

आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी म्हटलं, “खेल आपने सुरू किया, खत्म हम करेंगे, न्याय मिलेगा”. सुरुवात तुम्ही केली आहे आणि शेवट आम्ही करू, न्याय मिळणार असं ट्विट करत नितेश राणेंनी एक सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. दिशा सलियान प्रकरणात राणेंनी केलेल्या वक्तव्यांनंतर महिला आयोगाच्या (Women’s Commission) निर्देशानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आत्महत्या की घातपात? बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

तसेच याआधी राज्य सरकारने नारायण राणेंना अटक करायला पोलीस पाठवले होते. संतोष परबांच्या प्रकरणातही नितेश राणे जामीनावर बाहेर फिरत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंत पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. आता दिशा सालियाच्या प्रकरणात राणेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

नारायण राणे नेमंक काय म्हणाले होते?

दिशा सालियन हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली होती. दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स… १६५ वर्षांचा कलेचा वारसा

सात महिने उलटून गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पानं कोणी फाडली, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता, असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या