नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; हे आहे कारण...

नितेश राणेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; हे आहे कारण...

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

भाजप आमदार नितेश राणे (BJP mla nitesh rane) यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणी होणार होती. परंतु भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आज राज्यात दुखवटा असून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आज कोर्टात कुठलीही सुनावणी होणार नसल्याने हा मुक्काम वाढला आहे....

संतोष परब हल्ला (shivsena santosh attack issue) प्रकरणात नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

सरकारी वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज म्हणने मांडायला पुरेसा वेळ मिळाला नाही. अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली. त्याचवेळी सरकारी वकील यांनी आमदार नितेश राणे यानी सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे याच्या समोर नको अशी मागणी केली जात आहे.

तसेच सरकारी वकीलांचे म्हणणे आहे की, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशासमोर सुनावणी सुरु आहे, त्यांच्या समोरच सुनावणी घ्यावी, अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com