हा कार्टा सिंधुदुर्गच्या मातीत कसा जन्मला; नितेश राणेंची टीका

हा कार्टा सिंधुदुर्गच्या मातीत कसा जन्मला; नितेश राणेंची टीका

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh rane) यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे...

आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन नितेश राणेंनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नितेश राणे म्हणाले की, अनिल परब हे सिंधुदुर्गातील आहेत. आमच्या मातीत हा कार्टा कसा जन्मला हेच कळत नाही. मला बाटलीत दोन ते तीन मच्छर भरून द्या, मी परब यांच्या घरी नेऊन मच्छर सोडतो, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, परब यांना बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागते.

उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोपदेखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार? अशी टीका राणे यांनी केली.

Related Stories

No stories found.