देशमुख, मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा; नितेश राणेंचा टोला

देशमुख, मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा; नितेश राणेंचा टोला

मुंबई | Mumbai

ईडीचे (ED) पथक आज सकाळी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी दाखल झाले आहे. सध्या ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे...

ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या अगोदरही ईडीच्या तीन वेळा नोटीसा राऊतांना गेल्या होत्या. मात्र हे महाशय वेगवेगळी कारणे देऊन पळायचे.

देशमुख, मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा; नितेश राणेंचा टोला
ही धाड अपेक्षितच; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

पळकुट्या व्यक्तींमधील ते एक व्यक्ती आहेत. तुम्ही जर कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नसाल तर तीन-तीन वेळा ईडीची चौकशी का चुकवता? असा सवाल त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, जे काही सत्य तुम्हाला सांगायचे होते ते तुम्ही ईडीला जाऊन सांगितले असते तर आजची सकाळ खराब झाली नसती. दररोज सकाळी येऊन तुम्ही महाराष्ट्राची सकाळ खराब करायचे, आज तुमची सकाळ खराब झाली आहे. राऊतांनी ट्विट केले होते की, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही.

देशमुख, मलिकांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार राहा; नितेश राणेंचा टोला
राऊतांना १०१ टक्के अटक होणार; नवनीत राणांचा दावा

तुम्हाला शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात बोलवत कोण आहे? तुमच्यासारखी घाण कुठल्याच पक्षाला नको आहे. तोंडातून थुकलेला चिविंगम आहे, तो कोणाला उचलून घ्यायचा आहे. त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या यांच्या बाजूला शिवथाळी खाण्यासाठी तयार व्हावे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com