“ही प्रजाती फक्त...”; मलिकांच्या 'त्या' ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच प्रत्युत्तर

“ही प्रजाती फक्त...”; मलिकांच्या 'त्या' ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे पाहून म्याव म्याव आवाज काढून डिवचलं. यानंतर याचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पहायला मिळालं.

त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांनी पैहचान कौन म्हणत एक मांजर आणि कोंबडी असा कॉकटेल फोटो शेअर राणेंवर टीका केली होती. आता त्यालाच निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही मॉर्फ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आणि त्यावर शिर्क्षक देत म्हटलं, ही प्रजाती फक्त भंगारात आढळते. पेहचान कौन? असं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि नितेश काणे यांच्यातील हे ट्विटर वॉर आणखी पेटण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना विधानभवान जाताना म्याव म्याव करत चिडवल्यानंतर नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारकडून नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. फोटोमध्ये शरीर कोंबड्याचे होते तर चेहरा मांजरीचा होता. मलिकांनी एका कोंबड्याला मांजराचा फोटो मॉर्फ केला आणि पेहचान कौन ? असा खोचक सवाल केला. मलिकांना शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

दरम्यान एकमेकांवर टीका टीपण्णी करताना राजकीय नेते आता आपली पातळी सोडून भाष्य करताना दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती नेते विसरत चालले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com