Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची 'गौतमी पाटील'

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची ‘गौतमी पाटील’

मुंबई | Mumbai

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. नितेश राणेंनी संजय राऊत महाविकासआघाडीचे गौतमी राऊत असल्याचं म्हणत टीका केली. तसेच राऊतांना ते नेमके कुणाच्या बाजूने आहेत हेही माहिती नाही. त्यामुळे त सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलतात, असा हल्लाबोल केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

नितेश राणे म्हणाले की, गौतमी पाटील ती उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अनेकांचं मनोरंजन करते. ती स्वत:ही नाचते आणि लोकांनाही नाचवते. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला दररोज सकाळी येऊन वाटतं की, मी लोकांचं मनोरंजन करतो. तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे रोज सकाळी येऊन लोकांची सकाळ खराब करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. संजय राऊतांकडं गौतमी पाटीलनं मेकअपचं सामान पाठवावं, अशी मी तिला विनंती करतो. असे नितेश राणे म्हणाले.

ATM फोडले, रकमेसह मशीनही चोरून नेले, पण….

तसेच, भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या आमदार-खासदारांचा अपमान झाल्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि मविआमध्ये मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे त्या अडीच वर्षात अजित पवारांनी त्यावेळच्या ठाकरेंच्या आमदारांना पवारांनी किती निधी दिला?, अजित पवार हे सर्वात कमी निधी हे शिवसेनेच्या आमदारांना द्यायचे, असं म्हणत राणेंनी अजित पवारांवर टीका केली.

भाजपासोबत युती असताना शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि ठाकरेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप मान-सन्मान द्यायचे. जेवढे त्यांचे भाऊ देणार नाहीत, तेवढा मान हे फडणवीस ठाकरे कुटुंबियांना द्यायचे. म्हणून तर ठाकरे ट्रस्टवर स्मारक बनतंय. या सर्व परवानग्या फडणवीसांनीच मिळवून दिल्या, असंही राणे म्हणाले.

Monsoon Update : यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर

दरम्यान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सकाळी गजानन कीर्तिकरांवर राऊतांचं फार प्रेम ऊतूजात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. गजानन कीर्तिकरांबद्दल अजिबात चिंता करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते संजय राऊतांसारखे नाहीत, असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या