Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल; म्हणाले, ठाकरे गटाचे उमेदवार...

नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल; म्हणाले, ठाकरे गटाचे उमेदवार…

मुंबई | Mumbai

सध्या देशातील विविध पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. त्यात महाराष्ट्रातील नेते ही मागे नसून महाराष्ट्रातील नेत्यांनी ही निवडणुकींच्या उद्दीष्टाने मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. महाविकास आघाडीत आगामी लोकसभेच्या जागांच्या जागावाटपावर चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच अशातच भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेबद्दल (ठाकरे गट) मोठा दावा केला आहे…

- Advertisement -

पुण्यातील लोकसभेच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटवरुन नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : “कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो…”; पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांचं सूचक ट्विट

यावेळी आमदार राणे म्हणाले, एक वर्षात उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्ष बांधणं शक्य नाही. मुळात तो त्यांचा पिंड नाही. तसेच त्यांना आगामी निवडणुकीत पक्षचिन्ह देखील मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, आमदार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, अशी माझी खात्रीलायक माहिती आहे.

तसेच “ठाकरे गटाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निडणूक लढावेत यासाठी स्वतः खासदार संजय राऊत दोन वेळा प्रस्ताव घेऊन गेले आहेत. हे खरं की खोटं ते संजय राऊतांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचे आमदार येणारी निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. तशी तयारी त्यांनी आता करावी. हे मशाल चिन्ह राहणार नाही. संपूर्ण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. तशी तयारी संजय राऊतांनी केली” असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी केला आहे.

ISRO : NVS-01 आणि GSLV-F12 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा व्हिडिओ

पुढे ते म्हणाले की, आजच्या सामना अग्रलेखाचं शीर्षक चुकलं आहे, असं मला वाटतं. मालक, महाल आणि मालकाचा महाल! असं शीर्षक देऊन अग्रलेख आला असता तर तो सत्यपरिस्थितीवर झाला असता. आजचा अग्रलेख जळफळाटाने लिहिला गेलाय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच मालकाने मातोश्री २ च्या नावाखाली जो महाल बांधलाय तो कसा बांधला. कसा मिळवला याची माहिती संजय राऊतने लिहायला हवी होती. आमच्या माहितीप्रमाणे मातोश्री २ मध्ये इंटेरियरसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पैसा आणला कुठून? ही माहिती संजय निरुपमने बाहेर आणलीय. म्हणजे माहिती देणारे महाविकास आघाडीचेच लोक आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या