
मुंबई | Mumbai
प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांची कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Phule) आता राजकारण गाजवणार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीर प्रवेश केला आहे....
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाज स्तरावर काम करणारा असल्यामुळे विशेषतः महिलांसाठी काम करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तरुणांनी किनाऱ्यावर न बसता राजकारणात यावे असे म्हणतात त्यामुळे मी राजकारणात आले. जी जबाबदारी दिली जाईल ती मी घेईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ, कोवळी उन्हे , श्रीमंत , सोनाटा, वासंसी जीर्णनी, सुदामा के चावल, या नाटकात काम केले आहे. तर गरगी यांनी आजवर राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी अशा गाजलेल्या मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. भाडीपा, चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केले आहे. गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation या विषयात पदवीधर आहेत.