Nilesh Rane
Nilesh Rane
राजकीय

निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या समवेत पंढरपूरला शासकीय महापूजा करण्यासाठी गेले होते.

Nilesh Jadhav

मुंबई - काल झालेल्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या समवेत पंढरपूरला शासकीय महापूजा करण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी ८ तासाचा प्रवास स्वतः गाडी चालुवून केला. या वरून सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना नेटकरी दिसत आहे. यावरूनच निलेश राणे यांनी त्यांच्यावर ट्विट द्वारे टीका केली आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते." अश्या कठोर शब्दात टीका त्यांनी केली आहे.

उद्या मुख्यमंत्री गाडी पण धुतील तर आम्ही काय करू??

निलेश राणे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com