Nilesh Rane
Nilesh Rane
राजकीय

निलेश राणेंना करोनाची लागण

ट्विटरवर दिली माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही आपली करोनाची चाचणी करून घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं. Nilesh, son of former Maharashtra CM Narayan Rane has tested positive for the coronavirus

करोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानं करोनाची चाचणी केली. त्यात माझा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी, असं ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांनी सिधुदुर्गात करोनाची चाचणी केली होती. परंतु त्यावेळी चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. परंतु त्यांनी शनिवारी रात्री करोनाची लक्षणं दिसत असल्यानं पुन्हा मुंबईत करोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल आज मिळाला असून तो पॉझिटिव्ह आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com