
सातारा | Satara
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत (NCP) अनेक जण इच्छूक असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहे.
आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पुढचा मुख्यमंत्री (Chief Minister) हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे
कराडमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.