Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकारने केलेले नवे कायदे जनतेची दिशाभूल करणारे : अ‍ॅड.वळवी

केंद्र सरकारने केलेले नवे कायदे जनतेची दिशाभूल करणारे : अ‍ॅड.वळवी

शहादा – Shahada – ता.प्र :

केंद्र सरकारने तयार केलेले नवनवीन कायदे व धोरणे सामान्य जनतेला दिशाभूल करणारे असून शेतकरी आणि गोरगरीब कामगारांना संपविणारे आहेत, असे मत माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

तालुक्यातील मंदाणे येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मंदाणे व असलोद जिल्हा परिषद गट व गणातील कार्यकर्त्यांची विविध विषयांवर सहविचार बैठक अ‍ॅड.वळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, शहादा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, माजी अध्यक्ष दिलीप गांगुर्डे, जि.प.सदस्य सुभाष पटले, पं.स.सदस्य गोपी पावरा, माजी पं.स.अध्यक्षा वनीता पटले, माजी पं.स.सदस्य लगन पावरा, काळूसिंग पावरा, स्वीय सहाय्यक गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर, जिल्हा सेवादल काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, दिनेश पवार, भोंगरा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्तर पावरा, जेष्ठ कार्यकर्ते ओंकार पाटील, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले की, भाजपने लोकांच्या फायद्याचे कायदे बंद करून स्वतःच्या फायद्याचे कायदे सुरू केले आहेत. शेतकरी व सामान्य कामगारांचे राज्य केंद्रातील सरकारने संपविण्याचा प्रयत्न केला असून कंपन्यांचे राज्य सर्वदूर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

काँग्रेस पक्षाने शेतकरी व सामान्यांना मजबूत करण्यासाठी आधी केलेले कायदे संपविण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने सुरू केले आहेत. म्हणून एकत्र राहणे काळाची गरज असून तरुणांनी पुढे येऊन धुरा सांभाळली पाहिजे.

केंद्र सरकारच्या किसान आणि कामगारविरोधी कायद्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला.

काँग्रेस पक्ष हा शेतकरी, शेतमजूर, कामगार व सामान्यांसाठीच आहे, याचे चित्र स्पष्ट आहे. आपल्या जिल्ह्याला पाच लक्ष स्वाक्षरी करण्याचा लक्षांक दिलेला आहे.

तो लवकरच पूर्णत्वास येत आहे. पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्षा आपल्याच आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी विकासकामांकरिता केव्हाही ऊभे आहोत.

कितीही राजकीय घडामोडी होवोत, कुणी कोणत्याही पक्षात जावोत आपला एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे काँग्रेस पक्ष. परंतु त्यासाठी कार्यकर्त्यानी एकजुट राहणे अत्यंत गरजेचे आहे. काँग्रेसचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, पं.स. सदस्य, जि.प.सदस्य, पक्षाचे पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना व सामान्य माणसाला सहकार्य करावे,असे आवाहन अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी केले.

यावेळी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी म्हणाल्या की, केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगारांसाठी कायदा केला यासाठी आपल्या काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. तर या कायद्यात असलेले धोरणे हे शेतकर्‍यांना नष्ट करणारे आहेत.

हे कायदे शेतकरी राजा व गोरगरीब मजुरांच्या जीवन मरण्याचा प्रश्नांशी निगडित असल्यानेच आपला काँग्रेस पक्ष व ईतर पक्ष केंद्राच्या या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध दर्शवित आहेत, असे अ‍ॅडवळवी यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदाणे व असलोद गटातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचलन चुनीलाल ब्राम्हणे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या