Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामंगल प्रभात लोढांकडून शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; नव्या वादाला तोंड

मंगल प्रभात लोढांकडून शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; नव्या वादाला तोंड

सातारा | Satara

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू आहे.

- Advertisement -

याच दरम्यान भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली आहे. “औरंगजेबाने शिवरायांना रोखलं, पण शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रतापगडावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल”, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या