राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजित कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजित कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोना corona विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने NCP या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक Chief Spokesperson of NCP Nawab Malik यांनी बुधवारी येथे दिली.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, ही पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट करताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी पक्षाने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोपवल्याचे मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या मंत्री आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती मलिक यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णयबैठकीत झाला आहे.

मात्र, मंत्री आणि पालकमंत्री तसेच संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षातंर्गत निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय नजीकच्या काळात ज्या निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केल्याचे मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com