राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहीत कंबोज यांच्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ

राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहीत कंबोज यांच्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ

मुंबई | Mumbai

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering case) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्यातच आता भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असा विश्वासही त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अशातच आज पुन्हा कंबोज यांनी आज आणखी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट (Tweet) त्यांनी केलंय. त्यामुळे आज नक्की कोणत्या नेत्यावरती कारवाई होणार आहे की आणखी कोणत्या बड्या नेताचा घोटाळा ते उघड करणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com