धुळे : राष्ट्रवादीचे वाढत्या महागाई विरोधात आंदोलन

धुळे : राष्ट्रवादीचे वाढत्या महागाई विरोधात आंदोलन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

घरगुती गॅस, इंधन दरवाढ, तसेच वाढत्या महागाई विरोधात धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. 2014 ते 2021 दरम्यान किराणा साहित्य, इंधन, इतर मालाच्या भाव कित्येक पटीने वाढला आहे. याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. असा आरोप करण्यात आला आहे.

घरगुती गॅसची किंमत 835 रुपये झाली आहे. वाढत्या महागाईमुळे गरीब, सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

करोनाची स्थिती व वाढती महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. वाढती महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार कोणताही प्रयत्न करतांना दिसत नाही. असाही आरोप करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने तात्काळ इंधन, गॅस, दरवाढ मागे घ्यावी. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी कराव्यात. वाढती महागाई नियंत्रणात आणावी यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com