जळगाव : इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध
जळगाव : इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर काळी शाई फेकून इंधन दराढीचा निषेध करण्यात आला.

देशात दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात वाढ होत आहे. यात पेट्रोलचे भाव प्रती लिटर 106 रुपये झाले असून गॅस सिलेंडरची किंमत देखील साडेआठशे रुपयांपर्यंत झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नोटीबंदी पासून अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यातच निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून सिलेंडरवर दिली जाणारी सबसिडी देखील बंद केली आहे. त्यामुळे शासनाकडे जमा होणारा पैसा जातो कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली.

त्यानंतर शिरसोली रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांकडून पेट्रोल पंपावर लावलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर काळी शाई फेकण्यात आली.

घोषणांनी दणाणला परिसर

आंदोलन करत असतांना आंदोलकांनी मोदी हटाओ देश बचाओ, मोदी सरकार हाय हाय, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार... शरद पवार, केंद्र सरकारचा निषेध असो, या सरकारच करायच काय खाली डोक वर पाय यासह विविध घोषणा देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्षांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे मोहाडीरोड परिसर दणाणून गेला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com