रुपाली चाकणकर यांनी दिला महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

रुपाली चाकणकर यांनी दिला महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर (NCP women state president Rupali Chakankar) यांनी राजीनामा (Resigned) दिलेला आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of the State Women Commission) आहेत. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी (Assembly elections0 चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम ठोकला. त्यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष (Women State President) पदही रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं.

आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांना न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी म्हणत विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आयोगातर्फे चाकणकर यांनी शिबीरं घेतली. महिला आयोगाचं काम अतिशय ताकदीने हाताळताना त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे वेळेअभावी म्हणावं असं लक्ष देता येत नव्हतं. कदाचित याच कारणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com