शेतकरी व्हेंटिलेटरवर का ?

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, केंद्राचा निषेध
शेतकरी व्हेंटिलेटरवर का ?

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

देशावर आधीच करोनाचे जीवघेणे संकट असतांना केंद्राने शेतकरी वर्गाला आणखी आर्थिक संकटात टाकले आहे. केंद्र सरकारने खतांची दरवाढ करून शेतकर्‍यांनाच व्हेंटिलेटरवर आणून सोडल्याचा आरोप धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाला निवेदन देवून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी श्रीमती पावरा यांच्यासह शहराध्यक्ष सरोज कदम, कार्याध्यक्षा मालती पाडवी जिल्हा उपाध्यक्षा प्रितम देशमुख, जिल्हा सचिव रश्मी पवार उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटले आहे की, आता शेतकर्‍यांचा खरीप हंगाम सुरू होईल, बी- बियाणे- खतांची खरेदी होईल. त्या आधीच शेतकर्‍यांना संकटात टाकणारा खत दरवाढीचा निर्णय घेऊन केंद्र सरकार शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या कष्टाचा, घामाने पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळत नाही व त्यात आता केंद्र सरकारने संतापजनक खतांची दरवाढ करून शेतकर्‍यांची चेष्टा चालवली आहे.

या करोना काळात कामगारांचे जथ्थे गावी परतले आहेत, सहाजिकच गावाकडे शेती हाच एकमेव व्यवसायाचे साधन शिल्लक राहिले असताना केंद्र सरकार मात्र खतांची दरवाढ करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे नमूद केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com