“मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव...”; ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीची खोचक टीका

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये श्रीकांत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीवर बसले असल्याचं दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी फोटो ट्विट करत, ''खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?' अशी टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com