सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे चंद्रकांत पाटलांवर का संतापले?

सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे चंद्रकांत पाटलांवर का संतापले?

मुंबई । Mumbai

राज्यातलं राजकारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) चांगलंच तापलं आहे.

भाजपच्या (BJP) वतीने बुधवारी मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारविरोधात (MVA govt) मोर्चा काढण्यात आला.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरली. त्यावरुन सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे (sadanand sule) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाषेवरुन भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

'हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटतं की, हे स्त्री द्वेषी आहेत जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. पण मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी देखील आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे.' अशा शब्दात सदानंद सुळेंनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

'कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या', अशी वैयक्तिक स्वरुपाची टीका चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com