Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले पहाटेचा शपथविधी हा....

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले पहाटेचा शपथविधी हा….

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Ajit Pawar) यांचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे सत्तास्थापनेसाठी शपविधीचा कार्यक्रम उरकला होता. या शपथविधी सोहळ्याच (Oath Ceremony) राजकारणात एकच धक्का बसला होता. अजित पवारांना (Ajit Pawar) सत्ताधारी अनेकदा पहाटेच्या शपथविधीवरुन लक्ष्य करत असतात. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. जयंत पाटलांच्या या विधानामुळे राजकारणात नविन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पहाटेच्या शपथविधीवर बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) भुलले असतील असं मला वाटत नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. ती उठवण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी विधानं केली आहे. त्याला आज महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही.

पुढे ते म्हणाले त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात सरकारमध्ये त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी फुटली नाही, तर शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही.

‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण –

मला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मी कदाचित शब्द वापरला होता. भाजपाकडे राष्ट्रवादीचा कल आहे अशी टिप्पणी कोणीतरी केली होती. त्याला देण्यात आलेली ही प्रतिक्रिया होती. त्यामुळे शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ते कसं आणि काय झालं हे माहिती नाही. पण शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झाला, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे. हा शपथविधी कोणीतरी जाणीवपूर्वक केला असं मला म्हणायचं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या