Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापवार, उद्धव, राज, फडणवीस आज एकाच व्यासपीठावर

पवार, उद्धव, राज, फडणवीस आज एकाच व्यासपीठावर

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्यावतीने दक्षिण मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. बाळासाहेबांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत रिगल सिनेमा जवळ बसविण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होत आहे.

जोगेश्वरीच्या मातोश्री क्लब मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची नऊ फूट असून तो ११ फूट उंचीच्या चबुतरावर बसविण्यात येणार आहे.

महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या