कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”

कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”

मुंबई | Mumbai

राज्यात नुकताच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तर भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, प. बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा नाही. कर्नाटकात आमदार फोडून भाजपानं सत्ता मिळवली. आगामी काळात मतदान करताना लोक याचा नक्कीच विचार करतील, असं शरद पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”
दुप्पट पैशांचे आमिष; प्राध्यापक-शिक्षिका दाम्पत्यास ४५ लाखांना गंडा

तसेच, हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय, असा इशारा शरद पवारांनी यावेळी बोलताना दिला.

कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”
Rahul Kalate : असं कसं झालं? ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त

मुख्य निवडणूक आयोगाच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्याच्या प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाने बदल केला आहे. आता समितीने आयुक्तांची नियुक्ती करायची आहे. यात पंतप्रधान आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेता यांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकृत विरोधी पक्षनेता नसेल तर संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा समितीत समावेश केला जाईल. लोकशाही व संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा आणि चांगला निर्णय आहे.

कसब्याच्या निकालावर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “देशभरातील आगामी निवडणुकांमध्ये…”
विजयानंतर गिरीश बापट यांची भेट; रवींद्र धंगेकरांमधील सुसंस्कृत राजकारण्याचं दर्शन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com