मुंबईत भेटीगाठी वाढल्या; आधी संजय राऊत, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला

मुंबईत भेटीगाठी वाढल्या; आधी संजय राऊत, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात मागील महिनाभर एनसीबीची मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीवरील कारवाई चर्चेमध्ये राहिली आहे. यामध्ये एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) देखील समीर वानखेडे (Sameer Wankhed) यांच्यावर रोज नवनवे आरोप करत धक्कादायक खुलासे करत आहेत.

अशातच आज शिवेसेनेच्या (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासोबतही शरद पवारांची गाठभेट झाली आहे. तासभर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित असल्यामुळे यातून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

दरम्यान कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसही करत असून, या सर्व प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी शरद पवार गृहमंत्र्यांना भेटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरण हा बनाव असून, भारतीय जनता पक्षाचे काही नेते यात सामील असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी देखील मुख्यमंत्री असताना ड्रग्स माफियाला साथ दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com