'अच्छे दिन म्हणत भाजपाने...'; शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

अच्छे दिन म्हणत भाजपाने (BJP) आणि केंद्र सरकारने (Central Govt) एकही गोष्ट पूर्ण केली नाही. अच्छे दिन पाहायलाच मिळाले नाही,....

लोकांना फोडून सरकार स्थापन करण्याचे काम भाजपाने केले, अशी टीका राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपावर केली आहे. ठाण्यातील बैठकीनंतर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले की, 'देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत. या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे.' तसेच, २०१४ साली यांनी अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. पुन्हा २०१९ साली यांनी न्यू इंडिया अशी घोषणा केली ती पूर्ण झालेली नाही. आता २०२४ साला साठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी घोषणा देण्यात येतेय. त्याची पूर्तता होतेय का हे पाहणं महत्त्व आहे.' असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी बिल्कीस बानो प्रकरणावरही पवार यांनी भाष्य केलं. 'महिला अत्याचारासंदर्भातील संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यांच्यावर बलात्कार केला, त्यांच्या मुलांसहीत नातेवाईकांची हत्या केली. त्यात खालचं कोर्ट, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्टाला कठोरातील कठोर शिक्षा दिली. त्यानंतर ती शिक्षा जन्मठेप झाली. ही जन्मठेप आजन्म होती. असं असतानाही गुजरातच्या भाजपा सरकारने असा निर्णय घेऊन त्यांना सोडलं. नुसतं सोडलं नाही तर त्यांचा जाहीर सत्कार केला. याचं मला आश्चर्य वाटतं,' असं पवार म्हणाले.

तसेच, 'देशाच्या पंतप्रधानांचं भाषण मी नीट ऐकलं. आग्रहाने मोदींनी महिलांना सन्मान देण्यासंदर्भातील भूमिका मांडली. ते ज्या राज्यातून येतात. त्याच राज्यातील त्यांच्याच विचाराच्या सरकाने न्यायालयीन शिक्षा सुनावलेली असतानाही आरोपींना मुक्त केलं. लाल किल्ल्याच्या भाषणात सन्मानाची भूमिका मांडली गुजरातमधील निर्णयाने त्याची प्रचिती समोर आली' असा टोला लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com