शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचा हात; केसरकरांचा आरोप

शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचा हात; केसरकरांचा आरोप

मुंबई l Mumbai

आजपर्यंत राज्यात शिवसेना (Shivsena) जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केला आहे. ते बुधवारी दिल्लीत एका वृत्तवाहिनशी बोलत होते.

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर केले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

तसेच यावेळी दीपक केसरकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादीने आगामी निवडणुका एकत्र लढवाव्यात, असा आग्रह धरणाऱ्या शरद पवार यांचा समाचार घेतला. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने राज्यपालांना शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असल्याचं पत्र दिलं आहे. यामध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाऊ नये, असे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे मत दीपक केसरकर यांनी मांडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com