'बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले'

रुपाली चाकणकर यांनी साधला रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा
'बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले'

पुणे(प्रतिनिधी)

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं असून अप्रत्यक्षपणे रवी राणा (MLA Ravi Rana) आणि नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावर टीका केली आहे.

राज्याचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (mansoon season) संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून टीका केली जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) झालेल्या गदारोळानंतर भाजपाच्या (BJP) १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. भाजपाने विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले. दरम्यान रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.रवी राणा यांच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला होता. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com