
मुंबई l Mumbai
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल
गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.