Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यालता मंगेशकर पुरस्कार : ...तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता, रोहित...

लता मंगेशकर पुरस्कार : …तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Deenanath Mangeshkar Award) हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काल मुंबईतील (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात (Shanmukhananda Hall) प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. मात्र या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मात्र गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण तर होते, मात्र निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव नव्हते. त्यावरून आता शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान यावरुन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

‘पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते आदरणीय पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांनीही प्रत्येक कलेला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवार साहेबांची उपस्थित असती तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता.’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.

‘त्या’ जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंगेशकर कुटुंबियावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.’

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या