
मुंबई | Mumbai
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आणि महाराष्ट्रातून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी (sharad pawar) 48 तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील शिंदे सरकारला (Shinde Govt) कर्नाटक सीमावाद प्रकरणावरून सुनावले आहे.
आमदार रोहित पवार यांनी टि्वट करीत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही ? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही,असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना केला आहे.
"आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू... करू.. केंद्राशी बोलू..ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटक च्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!" असा टोला पवारांना लगावला आहे.