Video : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

Video : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
मंत्री नवाब मलिक

मुंबई | Mumbai

नवाब मलिक (Nawab malik) गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन NCB वर गंभीर आरोप लावत आहेत. NCB ने क्रूझवर केलेल्या कारवाईवरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम्ही NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपास्थित केले.

आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB वर त्यांचे जावाई समीर खान यांना फसवल्याचा आरोप केला आहे. तसेच माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'मुंबईत ८ जानेवारी रोजी एका व्हॉट्सअपवरुन काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचं त्यामध्ये आधीच सांगण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे या माहितीच्या खाली समीर वानखेडे यांचं नाव होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली.

पुढे ते म्हणाले की, '१२ जानेवारीला रात्री १० वाजता आपले जावाई, समीर खान यांना ईडीचं समन्स आलं आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. तसा मेसेज त्याच नंबरवरुन करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आलं. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला आठ महिने तुरुंगात रहावं लागलं तर मुलीला धक्का सहन करावा लागला असा आरोपबी नवाब मलिक यांनी केला. एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक करता आला नाही. आपल्या जावयाकडे २०० किलो गांजा नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचं स्पष्ट झालं आहे असंही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.