Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी : राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा झटका ?

मोठी बातमी : राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा झटका ?

नवी दिल्ली | New Delhi

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय झटके निवडूक आयोगाकडून देण्यात येत आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची ही मोठी कारवाई आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता केवळ प्रादेशिक पक्ष असणार आहे. एखाद्या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळणं म्हणजे प्रतिष्ठा वाढणं असंच मानलं जातं. निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जाची मान्यता दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यता रद्द केली आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण 2014 निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचलप्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.

निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.

नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला 2019च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या