Friday, April 26, 2024
Homeराजकीयखा.अमोल कोल्हेचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र

खा.अमोल कोल्हेचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (ncp mp dr. amol kolhe) यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर (central agriculture minister narendra singh tomar) यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्रासह देशभरात कांद्याच्या बियाणांच्या तुटवच्या संदर्भात त्यांनी हे पत्र लिहीले आहे.

- Advertisement -

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हंटले आहे की, “यावर्षी महाराष्ट्रासह देशभरात कांद्याच्या बियाणांचा तुटवडा असल्यामुळे त्यांच्या किंमतीत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. कांद्याच्या बियाणाचा हा दर सध्या प्रतीपिशवी तीन हजार ते साडेतीन हजारांच्या घरात आहे. गेल्यावर्षी हाच दर दीड हजारांच्या आसपास होता. गेल्या वर्षी विपरीत मोसमी स्थितीमुळे कांद्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत. दुसरीकडे कांदा बियाणांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.भारतातून विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या माध्यमातून सुमारे वीस देशांत कांद्याच्या बियाणाची निर्यात केली जाते. ती थांबवली तर देशांतर्गत निर्माण झालेला बियाणाचा तुटवडा दूर होइल. पर्यायाने त्यांच्या किंमती देखील नियंत्रणात आणता येतील. श्री नरेंद्र सिंग थोमरजी, आपणास नम्र विनंती आहे की,कृपया कांदाबियाणाची निर्यात थांबवून त्यांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सकारात्मक तोडगा काढावा. धन्यवाद.”

- Advertisment -

ताज्या बातम्या