वाढदिवस संजय राऊतांचा पण चर्चा रोहित पवारांच्या ट्विटची, वाचा नेमके काय म्हटले?

वाढदिवस संजय राऊतांचा पण चर्चा रोहित पवारांच्या ट्विटची, वाचा नेमके काय म्हटले?

मुंबई | Mumbai

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस आहे.

वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राऊत यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. राऊतांना शुभेच्छा देणारं रोहित पवार यांचं ट्विट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे आणि 'मोडेल पण वाकणार नाही, कुणापुढं झुकणार नाही', हा मराठी बाणा जगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊतसाहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात रोहित पवार यांनी राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com