Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय“पवार साहेबांनाही...”; देशमुखांच्या घरी 'ED'च्या छापेमारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

“पवार साहेबांनाही…”; देशमुखांच्या घरी ‘ED’च्या छापेमारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे | Pune

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ) छापे टाकलेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये (Pune) करोना आढावा बैठक झाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची छापेमारी

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, ‘राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं. आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही, ऐकलेला नाही. एजन्सीचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती, अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही, महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकाना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसते आहे.’

तसेच, ‘राज्यात सध्या करोनाचा धोका वाढत आहे. या भीषण जीवघेण्या संसर्गामुळे अनेक समस्या समोर आहेत. अशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही सगळे मंत्री, नेते, अधिकारी, आमदार, खासदार याच कामात व्यस्त आहोत. विरोधकांप्रमाणे सुडाचं राजकारण करण्यासाठी आम्हाला वेळ नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. इतकंच नाहीतर राज्यात कोरोना,आरोग्य व्यवस्था आणि बेरोजगारी अशी संकट असताना विरोधकांकडू असे प्रकार करणं दुर्दैवी आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांचं लक्ष करोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील म्हणाले. तसेच, ‘यंत्रणेचा तपास सुरु आहे. या प्रकरणाबाबत मी जास्त बोलणं उचित नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे.’ असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या