Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!

दिल्ली l Delhi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.

- Advertisement -

शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात (PMO Office) जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात पहिल्या टर्ममध्ये सातत्याने भेटी व्हायच्या. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये भेटी कमी झाल्या होत्या. आता ही मोठ्या कालावधीनंतर झालेली भेट आहे.

याआधी जूनमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची भेट झालीय. काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील दिल्लीत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या